Five Best Places To Eat in Nashik

  1. साधना मिसळ

Misal
धावपळीच्या जीवनात एकांत परिवारासोबत वेळ घालवणे फार कठीण असतं, परंतू परिवारासोबत एक छोटी सहल तीही चुलीवरच्या मिसळ सोबत अनुभवायची असेल तर साधना मिसळला नक्की भेट दयावी. अस्सल गावरान चुलीवरची मिसळ तोंडाला चव देणारी आणि तिच्या सोबत गावाला आल्याचा अनुभव हे सर्व एकाच ठिकाणी नाशिकरांसाठी साध्य केलायं साधना मिसळने. मिसळ खाण्यासाठी ऐसपैस जागा आणि तोंडाला चव देणारी चुलीवरची मिसळ आणि तीही मातीच्या भांड्यामध्ये, गेल्या साठ पासष्ठ वर्षांपासून ही चुलीवरची मिसळ मिळते आधी जुन्या नाशकात एका गाडयावर मिळायची नंतर हॉटेलमध्ये आणि आता बाडदान फाट्यावरील साधना मिसळ या गावरान कट्ट्यावर मिळते. सर्व परिवारासोबत Small पिकनिक असो की Birthday Celebration किंवा सकाळच्या नाष्ट्यासाठी नाशिककर येथे येणे पसंद करतात आणि महत्वाची म्हणजे पुणे, मुंबई, इंदौर या ठिकाणी आपल्याला चुलीवरची मिसळ खावयास मिसळ.

  1. बुधा हलवाई

Potato Jilebi
नाशिकमध्ये आल्यावर मिठाईच नाव येताचं बुधा हलवायची आठवण येते. पुण्यामध्ये दगडूशेठ आणि नाशिकमध्ये बुधा हलवाई मिठाईसाठी प्रसिद्ध आहेत. बुधा हलवाईची जिलेबी असो, पेढा असो वा खवा नाव ऐकल्यावर खाल्याशिवाय कोणी राहातच नाही आणि त्यात सर्वांना आवडणारी मिठाई म्हणजे बटाट्याची जिलेबी जी वर्षातून फक्त दोनदाच बनते. एकदा महाशिवरात्रीला व एकदा उपवासाच्या दिवशी उपवासासाठी प्रसिद्ध असलेली ही बटाट्याची जिलेबी खाण्यासाठी नाशिककर दोन – तीन दिवस आधीच नंबर लावतात. बटाटे, साजूक तूप, आणि अजून काही पदार्थ यांची मिळून बनलेली ही जिलेबी सर्वांना आवडते. भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून बुधा हलवाई नाशिककरांच्या जीभेचे चोचले पुरवतात. जुन्या नाशकात अगदी छोट्या जागेवर असलेल्या छोट्या दुकानांपासुन ते मोठ्या MIDC मधील कंपन्यांमध्ये यांचे कार्यक्षेत्र पसरलेले आहे. यांची मिठाई Export सुद्धा होते. अशी गोड बुधा हलवाई यांची जिलेबी व अन्य सर्व मिठाई सर्वांना आवडते.

  1. सायंतारा वडेवाले

Sabudana Vada
नाशिक Wine साठी प्रसिद्ध तसेच सायंतारा वडेवाले साबुदाण्याच्या वड्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक उपवासाला साबुदाण्याचे वडे वेगळ्या पद्धतीने बनवलेले व त्या सोबत असणारी चवदार चटणी खाण्यासाठी नाशिककर या ठिकाणी आवर्जुन हजेरी लावतात. बटाटा, साबुदाणा, दुध मिळून बनलेले हे वडे चवीला सुरस व तेवढीच पौष्टीक ही असतात. गेल्या पंधरा वर्षांपासून नाशिकमध्ये असलेले हे सायंतारा वडेवाले साबुदाणा वड्याबरोबर बटाटे वडे तेवढ्याच चवदार पद्धतीचे बनवतात या सर्वांसोबत असलेल्या अनेक नाष्टयांच्या पदार्थांमुळे सायंतारा वडेवाला हा सर्व नाशिककरांसाठी पार्सल पॉईंट झालायं आणि तुम्ही सुद्धा हे चवदार वडे खाण्यासाठी सायंतारा वडेवाले सेंटरला नक्कीच कधीतरी भेट दया.